38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeराजकीय'उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील', ठाकरेंची शिंदेंच्या महत्त्वकांक्षी लालसेवर टीका

‘उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील’, ठाकरेंची शिंदेंच्या महत्त्वकांक्षी लालसेवर टीका

टीम लय भारी

मुंबई : शिवसेनाप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज (दि. 27 जुलै) प्रसारित झाला, यावेळी सामनाचे संपादक संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांवर त्वरीत आणि चपखळ उत्तरे देत ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपला तुफान शाब्दिक फटकेबाजी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कशाप्रकारे विश्वासघात केला हे सांगताना “भाजपवाल्यांनो, सावधान… उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे,” असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला.

राज्यातील शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले, काही दिवसांतच अवघ्या राजकारणाची दिशा बदलली. एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट शिवसेनेला भारी पडू लागला आणि शिवसेनेतील एकएकजण शिंदेगटाकडे वळू लागले. दरम्यान या सत्तानाट्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा शिवसेनेचे मुखपत्र सामनाला जाहीर मुलाखत दिली आणि प्रत्येकच मुद्यावर त्यांनी आपले मत मांडले, यामध्ये त्यांनी भाजप आणि शिंदे सेनेला धू धू धूतले, शिवसेनेला पडलेले खिंडार, शिवसेनेची पुढची दिशा, शिवसेनेचे राजकीय महत्त्व, बाळासाहेबांचे विचार, निवडणुकांचा आग्रह, महाविकास आघाडी सरकारचे यश – अपयश, हिंदुत्व, राज्यातील विकासकामे, आरेचा मुद्दा अशा अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली.

सदर मुलाखत दोन विभागात प्रसारित झाली आहे. या मुलाखतीचा एक भाग काल प्रसारित झाला तर दुसरा भाग आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रसारित झाला आहे. या मुलाखतीत बोलताना त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. मुलाखतीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलत असताना त्यांनी भाजपाला सावध राहण्याचा इशाराच दिला आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान… उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, असे म्हणून ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंच्या महत्त्वकांक्षी लालसेवर सडकून टीका केली आहे.

दरम्यान, बंडखोरांवर बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)म्हणाले की, आधी भाजपाबरोबर सत्तेत होतो, तेव्हा भाजपा त्रास देतोय असं म्हणायचे. भाजपा नको असं सांगणारे हेच लोक…गावागावात भाजपा सेनेला काम करू देत नाही, भाजपा शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता.. 2019 साली भाजपाने खोटेपणाचा कळस केलाय… ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला… तर म्हणे आता काँग्रेस राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणं शोधताय असं म्हणत बंडखोरांच्या या दुहेरी वागणुकीला ठाकरेंनी चांगलेच सुनावले आहे.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : शिंदे-भाजप सरकारने घेतलेले निर्णय राजकीय फायद्यासाठी?

VIDEO : आणि भीती खरी ठरली!

११ वीची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी